Ad will apear here
Next
चित्रपटप्रेमींसाठी शुक्रवारी ‘डियर डायरी’ चित्रपट
 नाशिक :  ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांचा ‘डियर डायरी’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अँड ट्रेनिंग हब, विश्वास लॉन्स येथे दाखविण्यात येणार आहे.

इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी
इटालीयन दिग्दर्शक नानी मोरेट्टी यांच्या तीन चित्रपटांच्या मालिकेतला हा पहिला चित्रपट आहे. साधारण ४० वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण चित्रपट केले आहेत आणि भूमिकाही केल्या आहेत. मानवी नात्यामधील गुंतागुंत व आत्मशोधाच्या वाटेवर येणाऱ्या  अनेक अनुभवांचा वेध मोरेट्टी यांनी आपल्या चित्रपटातून घेतला आहे. चित्रपटांच्या विषयांच्या शोधात असलेला एक दिग्दर्शक म्हणजेच असा त्यांचा स्वत:चा प्रवास त्यांनी यातून मांडला आहे. १९९३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचा कालावधी १०० मिनीटांचा आहे. 

‘हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे’, असे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे आणि विक्रम मोरे यांनी केले आहे.

‘चित्रपट चावडी’उपक्रम :
दिवस : शुक्रवारी, १८ ऑगस्ट
वेळ : संध्याकाळी ६.३० वाजता
स्थळ : डिझास्टर मॅनेजमेंट  अँड ट्रेनिंग हब, विश्वास लॉन्स
ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZKLBF
Similar Posts
‘चित्रपट चावडी’ कार्यक्रमात ‘ए समर्स टेल’ चित्रपट नाशिक : ‘चित्रपट चावडी’ या उपक्रमांतर्गत २१ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सुप्रसिद्ध फ्रेंच दिग्दर्शक एरिक रोहमर यांचा ‘ए समर्स टेल’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. चित्रपटासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे.
‘चित्रपट चावडी’वर पाहा ‘टू डेज वन नाइट’ नाशिक : मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे नाशिक विभागीय केंद्र व नाशिक येथील विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८, कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी, १६ जून २०१७ रोजी सायंकाळी
नाशिकमध्ये गझल लेखन कार्यशाळा नाशिक : मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक येथील विभागीय केंद्रातर्फे शनिवारी, २७ मे रोजी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील नितीन देशमुख, तसेच अरुण सोनवणे हे या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेसाठी ३०० रुपये शुल्क आहे. इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा,
व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळा नाशिक : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक विभागीय केंद्रातर्फे व्यक्तिमत्त्व विकास व नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोल्हापूरचे संजय हळदीकर सहभागींना मार्गदर्शन करणार आहेत. सर्व इच्छुकांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाविषयी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language